80.He frowned

  1. १. त्याने तोंड आंबट केले आणि तोंड फिरविले
  2. २. (केवळ अशासाठी) की त्याच्याजवळ एक आंधळा आला
  3. ३. तुम्हाला काय माहीत, कदाचित तो सुधारला असता
  4. ४. किंवा त्याने उपदेश ऐकला असता आणि त्याला उपदेश लाभदायक ठरला असता
  5. ५. (परंतु) जो बेपर्वाईने वागतो
  6. ६. त्याच्याकडे तर तुम्ही पुरेपूर लक्ष देत आहात
  7. ७. वास्तविक त्याच्या न सुधारण्याने तुमची काहीच हानी नाही
  8. ८. आणि जो मनुष्य तुमच्याजवळ धावत येतो
  9. ९. आणि तो भीत (ही) आहे
  10. १०. तर त्याच्याशी तुम्ही उपेक्षावृत्ती दाखविता
  11. ११. हे योग्य नाही.१ कुरआन तर बोध (दायक वस्तू) आहे
  12. १२. ज्याची इच्छा होईल (त्याने) यापासून बोध घ्यावा
  13. १३. (हा तर) आदर-सन्मान पूर्ण ग्रंथांमध्ये आहे
  14. १४. जे उच्चतम व पवित्र आणि स्वच्छ शुद्ध आहेत
  15. १५. अशा लिहिणाऱ्यांच्या हातात आहे
  16. १६. जे उच्च दर्जाचे पवित्र आहेत
  17. १७. अल्लाहची मार असो मानवावर, कसा कृतघ्न आहे
  18. १८. याला (अल्लाहने) कोणत्या वस्तूपासून निर्माण केले
  19. १९. (याला) एका वीर्यबिंदूपासून मग अनुमानावर राखले त्याला
  20. २०. मग त्याच्यासाठी मार्ग सोपा केला
  21. २१. मग त्याला मरण दिले आणि मग कबरीत गाडले
  22. २२. मग जेव्हा इच्छा होईल, त्याला जिवंत करील
  23. २३. मुळीच नाही. त्याने आतापर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन केले नाही
  24. २४. माणसाने आपल्या भोजनावर नजर टाकली पाहिजे
  25. २५. की आम्ही भरपूर पाणी वर्षविले
  26. २६. मग जमिनीला चांगल्या प्रकारे फाडले
  27. २७. मग तिच्यातून अन्न (धान्य) उगविले
  28. २८. आणि द्राक्ष व भाजीपाला
  29. २९. आणि जैतून व खजूर
  30. ३०. आणि घनदाट बागा
  31. ३१. आणि मेवे व (गवत) चारा (देखील उगविला)
  32. ३२. तुमच्या वापराकरिता व फायद्याकरिता आणि तुमच्या चार पायांच्या जनावरांकरिता
  33. ३३. मग जेव्हा कान बधीर करून टाकणारी (कयामत) येईल
  34. ३४. त्या दिवशी माणूस पळ काढील आपल्या भावापासून
  35. ३५. आणि आपल्या माता व पित्यापासून
  36. ३६. आणि आपल्या पत्नी व आपल्या संततीपासून
  37. ३७. त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या दिवशी अशी चिंता (लागून) राहील, जी त्याला (व्यस्त राखण्या) साठी पुरेशी असेल
  38. ३८. त्या दिवशी अनेक चेहरे उज्वल असतील
  39. ३९. (जे) हसत आणि आनंदित असतील
  40. ४०. आणि बहुतेक चेहरे त्या दिवशी धुळीने माखलेले असतील
  41. ४१. त्यांच्यावर काळिमा आच्छादित असेल
  42. ४२. हे तेच इन्कारी, दुराचारी लोक असतील