106.Quraysh

  1. १. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
  2. २. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
  3. ३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे
  4. ४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली